तुमचे विचार तुम्ही चान्गल्या शब्दातही मान्डु शकले असता... परन्तु ते तुम्ही मुद्दामच टाळले असे वाटतेय ... किन्वा तुमचा आजचा प्रतिसाद वाचुन असे खेदाने म्हणावे वाटते की तुमचे भाषेवरील प्रभुत्व फ़ारच कमी आहे.
आपले म्हणने (मग भले ते चुकीचे की बरोबर) हे लोकाना चान्गल्या / कन्विन्सिन्ग भाषेत सान्गायला जमलेच पाःईजे ...
अहो, सचिनराव, निदान हा उपदेश तरी " चांगल्या शब्दांत, भाषेवरील प्रभुत्व दाखवून देत, चांगल्या कन्विन्सिंग भाषेत " करायचा !
असो. हलकेच घ्या. एक सांगु का? तुमचे विचार चांगले आहेत. मात्र आपण सादरीकरणाकडे तितकेसे लक्ष दिलेले दिसत नाही. एखादी असती तर ठीक होते, पण दरवाक्यात शुद्धलेखनाच्या चुका दिसतात. असे का? जर मराठी टंकीत करणे जमत नसेल, तर सराव करा. ते दिसते तितके अवघड नाही. तसेच विरामचिह्नांकडेही लक्ष द्यायला हवे, आपण काहीवेळा जे रंग वापरता तेही भडक असतात(विशषतः लाल). असो.
कलोअ,
एक_वात्रट