वात्रट महाशय,

अहो खरोखरच गजानन महाराजांविषयी माहिती हवी असेल तर काही मंडळींनी सुचविलेल्या संकेतस्थळांना भेटी द्या; मुख्य म्हणजे या चर्चेच्या आरंभकाचे समर्थन केल्यागत एखाद्या प्रतिसादाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा सरळ नव्याने आपला प्रश्न एक स्वतंत्र लेखन म्हणून प्रसिद्ध करा. मला या महाराजांविषयी फारसे ज्ञान नाही, तसा दावाही मी केलेला नाही तेव्हा मला विचारून तुम्हाला काही फारशी माहिती मिळणार नाही.

मी फक्त असंस्कृत लेखन व सुसंस्कृत लेखन यातला फरक सांगितला, मान्य नसेल तर त्यावर अवश्य प्रतिप्रश्न करा. उत्तर जरूर देइन.