नमस्कार,

कळविण्यास आनंद होतो की श्री तात्या अभ्यंकर यांच्या मनोगतावरील बसंतचं लग्न या लेखमालिकेचा ओळख हा प्रथम भाग आमच्या त्रिवेणी कला मंच, जुहू, मुंबई व Arts of the Universe, जुहू, मुंबई या दोन संलग्न संस्थांकडून एकत्रितपणे निघणाऱ्या त्रैमासिकात नुकताच प्रसिद्ध झाला असून सभासदांच्या पसंतीस उतरला आहे.

या लेखमालिकेचे इतरही भाग यथावकाश प्रसिद्ध करण्याचे आहे.

'फाईन आर्टस्, द हेरिटेज ऑफ इंडिया' ही आय टी सी पुरस्कृत संगीत रिसर्च ऍकॅडमी, कलकत्ता (ITC-SRA) या संस्थेशी संलग्न असलेली दिल्लीस्थित संस्था. या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री देवप्रकाश बाली हे बसंतच्या लग्नाच्या सर्व भागांचा इंग्रजीतून अनुवाद करणार आहेत. या सगळ्याचे श्रेय निर्विवादपणे मनोगतालाच आहे, असे आनंदाने सांगावेसे वाटते.

आमच्या त्रिवेणी कला मंच, जुहू येथे तात्यांचा संगीतविषयक व्याख्यान-प्रात्यक्षिक स्वरूपाचा एक कार्यक्रमही झाला आहे. मनोगतावर 'आगामी कार्यक्रम' या सदरात आधी ही माहिती दिली होती, परंतु हा कार्यक्रम फक्त सभासदांकरताच असल्याचे नंतर ठरले. त्यामुळे या बाबतची माहिती 'आगामी कार्यक्रम' या सदरातून काढून टाकण्यात आली होती.

सुप्रसिद्ध संगीतकार श्री ओ पी नय्यर, व सुप्रसिद्ध गायक श्री मन्ना डे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कळावे,
माधवी गाडगीळ.