"आपल्याला जर फाटक्या, अस्ताव्यस्त कपड्यांची आणि तुटक्या, फुटक्या बाह्य वस्तूंची लाज वाटते तर आपल्या दरिद्री कल्पना आणि हीन विचारांची किती लाज वाटली पाहिजे? फोलपटे सुंदर आणि सडके दाणे असेच आहे हे!"
- अल्बर्ट आइन्स्टाइनच्या या वाक्याचा भावानुवाद

इथे मिळालेला आणखी एक प्रसंग,
आइनस्टाइनच्या पत्नीने जेंव्हा जर्मन राजदूताला भेटण्यासाठी त्यांना चांगले कपडे घालण्यास सांगितले तेंव्हा आइन्स्टाइन म्हणाले, "जर त्यांना मला भेटायचे आहे तर मी हजर आहे, जर त्यांना माझे कपडे बघायचे असतील तर माझे कपाटातले सूट दाखव."