समीर सुर्यकान्त यांच्या धन्यवाद मयुरेश! या प्रतिसादातून उद्धृत-

एकदा मला विचारले "रस्त्यावर असणाऱ्या ओव्हरहेड तारांच्या एका तारेवर जर कावळा बसला तर तो का मरत नाही, त्यातून तर खूप हाय व्होल्टेज विद्युतधारा वाहत असतात?"

झालं, माझं विचारचक्र सुरू झालं. हे तर खरं आहे की कावळा मरत नाही, फॉर दॅट मॅटर, कुठलाच पक्षी मरत नाही. आपण कितीतरी वेळा पाहतो. पण यामागचं कारण काय? हा खूपच बेसिक प्रश्न आहे.

ज्यांनी ११ वी आणि १२ वी शास्त्र विषयात केलं आहे त्यांना याचे उत्तर येते. पण मला बी. ई. ईलेक्ट्रीकल करून येत नव्हते. मी डोकं खाजवत होतो. काय कारण असेल बरे? का मरत नसावा कावळा? मरता तर काय मजा आली असती, निदान हा प्रश्न तरी उद्भवला नसता.

मग मी एक उत्तर तयार केलं, "सर, ऍक्चुअली, कावळ्याच्या पायांचे तळवे निसर्गतः इन्सुलेटींग मटेरीअलने झाकलेले असतात त्यामुळे साहजिकच कावळ्याला विद्युतप्रवाहापासून संरक्षण मिळते आणि म्हणून तो मरत नाही." सोप्पं तर आहे, काय अवघड आहे, काही फालतू प्रश्न विचारतो लेकाचा! असं मनात म्हणून मी त्याच्या प्रतिक्रीयेची वाट बघत बसलो.

तो अतिशय कुत्सित हसला. एवढं कुत्सित कधी "चार दिवस सासूचे" मध्ये रोहीणी हत्तंगडी देखील हसली नसेल. तो म्हणाला " तू ईंजिनीअरिंग पास कसा झालास? एका तारेवर कावळा बसला तरी त्याच्या शरीरातून विद्युतप्रवाह वाहण्यासाठी त्याच्या शरीराचा स्पर्श दुसऱ्या तारेला होणे आवश्यक आहे जेणेकरून सर्कीट पूर्ण होईल. सर्कीट पूर्ण झाल्यानंतर त्याला विद्युतप्रवाहाचा झटका बसून तो मरेल, अन्यथा नाही. अशा रीतीने माणूस जरी एकाच तारेला लटकला तरी तो मरणार नाही."