वरुण,

माझा रोख "बेडोल शरीराचे, अर्धनग्न अवस्थेतले, गान्जाची चिलीम फुन्कणारे असे लोक अवतारी पुरुष कसे असू शकतात?" यावर होता.

विमानतळावर धुडगूस घालून राष्ट्रीय संपत्तीचा नाश करणार्या आपल्या भक्तगणांना धारेवर न धरता त्यांचे समर्थन करणार्या कोणाही नरोत्तमाला नावे ठेवण्यात मला काहीही गैर वाटत नाही.

कपाळाला टिळा लावून खिशाला बिल्ला लावून फिरणाऱ्यांचा उपहास करताना आपणाही तेच करत आहोत ह्याची जाणीव नाही का?

वाचाः "विमानतळावर धुडगूस". अशा माणसाचा फोटू असलेले बिल्ले छातीवर मिरवणार्यांची कीव, आणि  मुळात असे बिल्ले छापून कल्ट तयार करणार्यांचा उपहास हा करायलाच हवा.

गजानन किंवा नरेंद्र अशा कुठल्याही महाराजांवर माझा व्यक्तिशः विश्वास किंवा श्रद्धा नाही (परंतु दोघांपैकी एकाची निवड करावयाची झाल्यास मी अर्धनग्न अवस्थेतील संन्यस्त गजानन महाराजांची निवड करीन).

- कोंबडी