शशांक राव,
असा शेरा दिल्याबद्दल राग मानू नका. अहो तुम्ही सगळे मिळमिळीत आणि गुळगुळीत प्रकार सांगितलेत हो. मनोगतावर प्रसिद्धी मिळविण्याचा मसालेदार आणि हमखास यशस्वी तुमच्या तर गांवीही नाही असे दिसते.
झटपट आणि परिणामकारक प्रसिद्धी मिळविण्यासाठी (१) काहीतरी सनसनाटी लिहायचे; (२) व्यक्तिगत दोषारोपाची खैरात उडवून द्यायची; आणि (३) प्रक्षोभक भाषा वापरायची.
झाले तर मग!! तुम्ही सांगितलेले सारे प्रकार मग नंतर प्रतिमा सुधारण्यासाठी वगैरे ठीक आहेत. म्हणजे जनाधारही टिकून राहतो.
हलकेच घ्या शशांकराव... भावना पोहचल्या असाव्यात ही अपेक्षा!!