आहे. गेयता कायम राखण्याच्या दृष्टीने काही मिसऱ्यांमध्ये शब्दांची पुनर्रचना सुचवावीशी वाटते. जसे मतल्याच्या सानी मिसरेत "पुन्हा पुन्हा ग नकोस" ऐवजी "पुन्हा पुन्हा नकोस ग" (अर्थात 'सुचवावेसे' वाटते ;) )

कल्पनांचे वावडे तुमच्या गजलांमध्ये कधीच दिले नाही, आणि दिसणारही नाही अशी खात्री आहे. या गझलेच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. मात्र आधीचा प्रवाह हिच्यात दिसला नाही, असे (मला) वाटले.

रुसण्याचा शेर आणि मतला जास्त आवडले.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.