हे तारा परीक्षेत तोडलेला नाही तर खेळताना तोडलेला आहे. माझ्या एका मित्राने तो राहात असलेल्या संकुलातील लहान मुलांच्या खेळाचे वर्णन केले ते असे होते. लहान वयातच तारे-तारका उदयास येतात त्या अशा -

काही मुले "रामायण रामायण" खेळत होती. खेळामध्ये राम वनवासाला जाण्याचा प्रसंग आला तेव्हा सीता झालेली मुलगी राम झालेल्या मुलाला म्हणाली "ह्यावेळी आपण वनवासाला कुठे जायचं?"