गण गण ---- वरील प्रतिसाद वाचून एका जुन्या कथेची आठवण झाली  एक गृहस्थ काशियात्रेला गेले.काशियात्रेस गेल्यावर कशाचा तरी त्याग करायचा अशी पद्द्धत असे.या गृहस्थानी राग सोडायचा असा निर्णय घेतला.परत आल्यावर त्याना भेटायला येणारा प्रत्येकजण विचारू लागला,काय राव,तुम्ही काय सोडल ? पहिल्या काही माणसाना हसतमुखान आणि अभिमानान सांगितले,`आता मी रागाचा पूर्ण त्याग केला.आता नेहमी हसतमुख रहाणार कोणालाही रागावणार नाही ऐकणाऱ्यालाही बरे वाटायचे,काऱण हे गृहस्थ तसे रागीट म्हणून प्रसिद्ध होते. पण जसजसे अधिक अधिक विचारू लागले तसा यांचा पारा हळू हळू चढू लागला.मग पुढ्च्या लोकानी  बुवा काय सोडले? विचारल्यावर बुवा उत्तरले राग,आणखी काही लोक विचारुन गेले‌ शेवटी बुवा कंटाळलें नंतर आलेल्याने हा प्रश्न विचारताच बुवा तडकून बोलले,येवढ कस कळत नाही गद्ध्या,राग सोडला मी राग कळल का की देऊ एक तोंडात?  थोडक्यात संत तुकाराम महाराजानी म्हटलेच आहे,आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना देव काही भेटेना ‌ सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.