रत्नागिरीच्या पूर्वेला मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून साधारणता २५ कि.मी. अंतरावर मार्लेश्वर आहे. येथील डोंगरातील स्वयंभू गुहा आणि लिंग निर्मिती पाहण्यासारखी आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या स्वयंभू गुहेत माणसांना न घाबरता साप फिरत असतात. अगदी पुजा करताना तुमच्या पुजापात्रावरसुद्धा येऊन बसतील. पण ना जाणे एकदा त्या गुहेत गेल्यानंतर सापांची भितीच वाटत नाही.
कोल्हापूरहून जात असाल तर साखरप्याला उतरावे.
मुंबई किंवा पुण्याहून(चिपळून मार्गे) जात असाल तर संगमेश्वरला उतरावे.
स्वतःचे वाहन असेल तर अगदी उत्तम कारण कोकणातील खेड्यातील घरे आणि मंदिरे पाहणे म्हणजे विक्रम आणि वेताळ कथेतील जणू काही 'एक आटपाट नगर होते'( आहे).
हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत झाले नसल्यामुळे राहण्यासाठी चांगल्या हॉटेलची सोय नाही. त्यामुळे रत्नागिरीला उतरून रत्नागिरीच्या आसपासची ठिकाणे पाहता-पाहता हे पाहून घेतले तर उत्तम..
--- (पर्यटण प्रेमी) संतोष