कथा छान आहे. सत्यकथा असल्यामुळे (शिवाय तुम्ही ती जवळून अनुभवली असावीत) तिच्या आणि त्याच्या मनातील भावना/घालमेल अतिशय उत्तम रितीने मांडता आल्या आहेत.
भोमेकाका आणि मयुरेश प्रमाणे आईने नकार दिल्यामुळे तिच्याशी लग्न न करण्याचा त्याचा निर्णय मलाही पटला नाही. कारण काय आहे ? हे कळल्याशिवाय अंतिम निर्णय घ्यायला नको होता. कधी कधी पालकांची कारणे मुलांच्या दृष्टीने गौणही असतात. किंबहुना पालकांनीच काय कारण आहे ते सांगून त्यालाच योग्य अयोग्य ठरवायला सांगितले असते तर इतक्या विचारी मुलाने नक्कीच योग्य निर्णय घेतला असता, असे वाटते.
श्रावणी