वा..
'ही वाट दूर जाते' ची चाल मस्त बसते आहे..
का पारिजात माझा फसवा तुझ्याप्रमाणे
बघ अंगणा तियेच्या शिंपून कोण गेले
ओळी आवडल्या.
सत्यभामेने कान्ह्याचे रुक्मिणीवर जास्त प्रेम असल्याची गोड तक्रार करणे आणि तरीही शेवटी कान्ह्यावर जास्त रुसवा दाखवू न शकणे मोहक आहे.
रुसवा ठरे क्षणाचा, येता समीप कान्हा
हलकेच रंग गाली चढवून कोण गेले
प्राचीन साहित्यात बहुधा 'सत्यभामा' हे थोडे स्वार्थी व्यक्तीमत्व रंगवतात आणि राधा आणि रुक्मिणी यांना जास्त महत्व दिले जाते. तुम्ही सत्यभामेची बाजू घेतल्याबद्दल तिच्यातर्फे माझे आभार!
आपली(एजंट)अनु