नाना... आता 'शुभम' मध्ये जाण्यास 'ना' करतो.
कारण आता फक्त तेथे 'लंच होम' झाले आहे. शिरा, उपमा, पोहे आणि मिसळ आता बंद झाले आहे. तुम्हाला फक्त तेथे व्हेज व नॉन-व्हेज राईस प्लेट मिळेल.
तरी पत्ता देतो;
'शुभम', ओम सुपर मार्केट जवळ, हॉटेल 'इडन कोर्ट' समोर,
सेनापती बापट रस्त्यावर(पुणे विद्यापिठाकडून सिंबॉयसिस कडे जाताना) पहिला चौक लागतो, त्याला विठ्ठल तुकाराम भोसले चौक असे नाव आहे. त्या चौकात डावीकडे वळा, सरळ जात रहा, उजव्या बाजूला भारती विद्या भवन, छोटी झेरॉक्सची दुकाने लागतात, असेच पुढे डावीकडे बघत गेलात की तुम्हाला 'शुभम' दिसेल. शुभम समोर आलात कि समोर चौकाचा सर्कल दिसेल, तिथेच डावीकडे ओम सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे मोठ्ठे दुकान आहे.