जयन्ता५२,
छान विषय आणि सुंदर रसग्रहण.
घननीळा मधील "अवघे" या शब्दाचा "अगदी" असा अर्थ अपेक्षित असावा असं वाटतं, आणि मला तो तसाच अधिक गोड वाटतो.
'गदिमा' ह्या सागरात अशी शब्द्ररत्ने भरपूर आहेत.शोध घेत राहणे हे आपले काम!
अगदी मान्य.
घननीळा या गाण्यामागची कल्पनाच किती सुंदर आहे! "सुटली वेणी, केस मोकळे, धूळ उडाली, भरले डोळे" अशी (म्हणजे एकांती भेटणार्या आपल्या दोघांवर वेगळाच संशय घेता येईल अशी) माझी अवस्था करणारा हा उंच झोका थांबव ...
- कोंबडी