आमच्या तोंडी परिक्षेतः
प्र.- रेझिस्टर(रोध) विद्युतमंडलात वापरल्याने ओव्हरकरंट प्रोटेक्शन का मिळते?
उः सरळ तारेतून करंट(प्रवाह) पटकन वाहून जातो, पण रेझिस्टर वेडावाकडा असल्याने प्रवाहाला वेडेवाकडे वळून जाऊन पोहचायला वेळ लागतो.
(रोध हा असाः )
दहावीच्या परिक्षेतः
२. भांड्यात मेणबत्ती लावून त्यावर काचेची हंडी उपडी ठेवल्यास काय होईल? कारणासहित स्पष्ट करा.(तो वातावरणात १/५ प्राणवायू असतो वाला प्रयोग हो!)
उ. काजळी लागून हंडी काळी होईल!