अतिशय सुंदर शैलीत लिहिलेली गझल,..!
पापास दंड नाही पुराव्याअभावी
नीतीस कायद्यांनी पराभूत केले
भेटीत हार माझी न झाली कधीही
नुसत्याच वायद्यांनी पराभूत केले
संन्यास घेत होतो, परावृत्त केले
त्या एक चेहर्यानी पराभूत केले
नाही जुमानली मी कुणाचीच आज्ञा
पण मूक आसवांनी पराभूत केले
माझे मला कळेना जगावे कसे ते
ह्या पेटल्या मढ्यानी पराभूत केले
ओलीस ठेवले वेदमंत्रास त्यांनी
धर्मास कर्मठांनी पराभूत केले
डोही उपासनेच्या बुडी घेत होतो
नाठाळ यौवनाने पराभूत केले......, खरोखरच मस्त
-मानस६