पॅटीस एकेकाळी लक्ष्मीरोडवर हिंदुस्थान बेकरीतसुद्धा चांगले मिळत. फक्त रविवारी सकाळी मर्यादित आवृत्तीत मिळत, आणि त्यासाठी भल्या पहाटे रांग लावावी लागे, आणि तरीसुद्धा मिळतीलच, याची शाश्वती नसे. (नंतर काही दिवस पुण्यातील गुरुवारच्या औद्योगिक साप्ताहिक सुट्टीसाठी गुरुवारी संध्याकाळीसुद्धा आणखी एक मर्यादित आवृत्ती निघत असे, पण ती बहुधा नंतर बंद झाली.) हल्ली काय परिस्थिती आहे, कोणास ठाऊक.
- टग्या.