ग़ालिब हा एक औघडदासच होता. त्याची शायरी सहजासहजी कळणे कठीण. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर त्याला इतर शायर काहीतरी सोपे काव्य म्हणायला सांगतात (सुन-सुन के उसे सुख़नवराने कामिल, आसां कहने की करते हैं फ़र्माइश) तेव्हा तो म्हणतो
गोयम मुश्किल वगरना गोयम मुश्किल
(इतके तरल विचार व्यक्त करायचे असतात की) मला अवघड शब्दातच सांगावे लागते कारण तसे केले नाही तर काही सांगणेच अवघड होईल.
माझा आवडता शेर -
ज़िक्र उस परीवश का, और फ़िर बयां अपना
बन गया रक़ीब आखिर, था जो राज़दां अपना
तिच्यासारख्या सौंदर्यवतीचे वर्णन, आणि ते करायला माझ्यासारखी अद्भुत वर्णनशैली असावी. अरेरे, मी ज्याला माझी प्रेमरहस्ये सांगत असे असा माझा मित्र, तोच शेवटी माझा (प्रेमात) प्रतिस्पर्धी बनला.
बरेच शायर काही ना काही प्रमाणात नास्तिकतेकडे झुकतात.
हम को मालूम है जन्नत की हक़ीकत लेकिन
दिलके बहलाने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है
प्रत्येकच शेर अस्सल सोने आहे, किती सांगावेत?
[बाय द वे, बाज़ीचा म्हणजे मैदान नसून खेळणे (क्रियापद नव्हे, नाम) असा अर्थ वाचल्याचे स्मरते]
शेवटी त्यानेच म्हटल्याप्रमाणे
ये मसाइले-तसव्वुफ़, ये तेरा बयान ग़ालिब
तुझे हम वली समझते गर न बादाख़्वार होता
तुझ्या काव्यातले हे तत्वज्ञानाचे संदर्भ, ही प्रभावी वर्णनशैली इ. पाहता, ग़ालिब, आम्ही तुला संतमहात्माच समजलो असतो, तू जर दारुड्या नसतास तर.