ही मराठी माध्यमाच्या शाळेत घडलेली घटना आहे.
पाचवीच्या वर्गाचे निरीक्षण होते. त्या वेळी शिक्षक मागच्या बाकावर बसत. निरीक्षकांच्या प्रश्नांना मुले कशी उत्तरे देतात ह्याचे दडपण असे, कारण त्यावरच शिक्षकांन शेरा मिळत असे. इंग्रजीचा तास होता.
निरीक्षक वर्गात आले. त्यांनी एक मुलाला नाव विचारले."व्हॉट इज युवर नेम?" मुलाने फक्त स्वतःचे नाव सांगितले. मग त्यांनी विचारले. "व्हॉट इज युवर सरनेम?" त्याने सांगितले " माय सर नेम इस कर्वे". निरीक्षकांनी नंतर ४-५ मुलांना हाच प्रश्न विचारला, "व्हॉट इज युवर सरनेम?" सगळ्यांचे उत्तर एकच! "माय सर नेम इस कर्वे".
मागच्या बाकावर बसलेल्या कर्वे सरांना घाम फुटला होता. कारण त्यांनाही निरीक्षकांनी हा प्रश्न विचारला असता तर हेच उत्तर देण्यावाचून गत्यंतर नव्हते.