नानांनी सांगितलेल्या नाना प्रकारच्या उपहारगृहांमधील नानाविध खाद्यपदार्थ खाण्याचा मी सध्या चंग बांधलेला आहे, या माझ्या प्रवासातील काही क्षणचित्रे;

१. मी सपत्नीक 'श्रेयस' मध्ये जाउन आलो. आम्हा दोघांना 'श्रेयस' चे जेवण आवडले नाही.

२. खंडिय(कॉन्टिनेंटल) पदार्थांसाठी मी भांडारकर रस्ता दोनदा पालथा घातला, पण 'दर्शन' चे दर्शन मात्र आम्हाला झाले नाही. हे हॉटेल कोठे बोळात आहे का हो?

 ३. पुष्करणी(कुमठेकर रस्ता) भेळ मात्र आवडली हो आपल्याला! पण तुम्ही कोणत्या पुष्करणीची गोष्ट करता आहात(शनिवार पेठेतल्या कि कुमठेकर रस्त्यावरच्या?)

वाह नाना वाह...