हाच शेर काहिसा एकेश्वरवादी वाटणे ही शक्य आहे. जर तूच एकमेव असशील तर हा वेगवेगळ्या देवांच्या धर्मांच्या नावाचा खेळखंडोबा का चालू आहे? असा अर्थ निघू शकतो.
हंगामा-ए-खुदा असे वाचल्यास, सर्वत्र प्रियसीच दिसत असताना हा 'देव' काय प्रकार आहे व त्याच्या मगे जग का धावत आहे? असा प्रश्न ग़ालिबला पडला आहे व त्याचे स्पष्टीकरण तो प्रियेकडे मागत आहे, असाही अर्थ निघू शकेल.