१. घराबाहेर भेटावे. शक्यतो निवांत खाता, पिता व बोलता येईल अशा ठिकाणी.
२. बायोडाटा, माहिती वगैरे नीट वाचून जावे. नोकरीच्या मुलाखतीप्रमाणे तयारी करावी. मुलाखत घेणे व देणे दोन्हीची.
३. नेहमीच्या पोशाखात जावे. (अगदी झोपेतला पायजमा, किंवा फाटकी जीन्स नको पण टाय वगरे पण नको.)
४. नवीन मैत्रिण भेटते आहे अशा विचाराने बोलावे. 'जमेल' असे गृहीत धरून धडाधड 'पुढचे' प्रश्न विचारू नयेत.
५. नव्या मैत्रिणीचा इगो जपावा. ;-)
६. जमेल तिथे तिचे मत विचारावे, आपले सांगावे. खरे सांगण्याचा प्रयत्न करावा. पण त्यातल्या त्यात एखादे पॉझिटिव्ह आणि एखादे निगेटिव्ह असावे. उदा. पायनॅपल रायता मस्त आहे, पण ही भाजी नाही आवडली बुवा आपल्याला.
७. अर्थातच 'अति सर्वत्र वर्जयेत' हे लक्षात ठेवावे.
मला हे सगळे करण्याची संधी मिळाली नाही, ते सोडा. पण पुष्कळ मित्रांच्या केसेस यशस्वी करून दिल्या आहेत. निःशंकपणे शंका विचाराव्यात. ;-)