तुमचे वर्णन वाचले आणि कोकणकडा आठवला. तिथे टोकाला एक खड्डा करुन ठेवला आहे छोटासा! त्यात बसून कॅमेरा गळ्यात लटकवून कोकणकड्यावरून खाली वाकायचे आणि छायाचित्र काढायचे. आहे का तो खड्डा अजून? आपण पडू नये म्हणून पाठीवर कुणाला तरी बसायला सांगायचे. ..पुन्हा त्या चित्तथरारक आठवणी जाग्या झाल्या. छायाचित्र पहायला उत्सुक आहे.
इतका सुंदर गड दुसरा नाही, हे खरे.
छाया