<<पण अनुभवाची सर त्यातल्या कशालाच नाही...!>>

हे मात्र अगदी खरे बोललात. मलाहि आमच्या हरिश्चंद्रागडाची आठवण आली ... आम्ही (६ जण) रात्री आळेफाट्याहून खुबीफाट्यापर्यंत एका ट्र्कमधून गेलो होतो. चॉघे जण ट्र्कच्या केबिन मधे बसले होते तर दोघे टपावर... सहज ट्रकमधे मागच्या बाजूला काय आहे म्हणून पाहिले तर आत ४-५ म्हशी शांतपणे आत उभ्या होत्या! रात्री खुबीफाट्यावरच्याच एकमेव ढाब्यावर थांबलो ... त्याच्या मालकाने आम्हाला त्याच्या शेळ्या, कोंबड्या आणि बदकांबरोबर झोपायला जागा दिली. बहुतेक त्या बदकांना आमचे अतिक्रमण आवडले नसावे कारण रात्री २.३० - ३ च्या सुमारास त्या बदकांनी चोची मारुन उठवले... एकतर तिथे लाईट नव्हते त्यामुळे आम्ही वौतागून पहाटेच गडावर निघायचे ठरवले. मग साधारण पहाटे ३.३० ला आम्ही गडाकडे निघालो. अर्थात आधी खिरेश्वर पर्यंत तंगडतोड करणे भाग होते. आम्ही गेलो त्यावेळी पिंपळजोगा (?) धरणाच्या भिंतीचे काम चालू होते, त्यावरुनच आम्ही गावात आणि मग पुढे गडावर गेलो.... 

फ़ारच मस्त आहे गड आणि कोकणकड्याची सर तर कशालाच येणार नाही. त्या कड्यावर उभे राहुन खाली बघताना कोणीतरी मागुन धरलेले बरे नाहितर सरळ पालथे झोपुन खाली बघावे. माझ्यामाहिती प्रमाणे तो @१७०० फ़ुट खोल कडा आहे (एकीव माहीती). पण हा कोकण कडा मनात कायमचा घर करुन राहतो, केवळ अप्रतिम.

तुमच्या लेखाने माझ्याही आठवणींना उजाळा मिळाला...

-स्वल्पविराम