एका उपाहारगृहाच्या मालकावर कोंबडीच्या मांसात भेसळ केल्याचा खटला चालू होता. फिर्यादीचे वकील त्या उपाहारगृहाच्या आचाऱ्याला प्रश्न विचार होते.

वकील: तुमचे मालक तुम्हाला कोंबडीच्या मांसात भेसळ करायला सांगायचे?
आचारी: हो.
वकील: कोंबडीच्या मांसात तुम्ही काय मिसळायचा?
आचारी: घोड्याचे मांस.
वकील: दोन्ही मांसाचे काय प्रमाण असायचे?
आचारी: जेवढ्यास तेवढे.
वकील: म्हणजे एक किलो कोंबडीच्या मांसात एक किलो घोड्याचे मांस का?
आचारी: नाही. एका कोंबडीला एक घोडा.