भास्करराव -
खरेतर दीर्घ लेख लिहायचा विचार नव्हता... केवळ प्रस्तावना लिहायचे डोक्यात होते. पण एकातून एक विचार सुचत गेले; म्हणून मुक्तचिंतन या रूपात स्वतंत्रपणे मांडले.
प्रकाशित करण्याआधी काही मिनिटे एका जवळच्या मित्राला सहज म्हणून लिखाण दाखविले. त्यानेही बाकी काही नाही पण अगदी तुम्ही सांगितले तेच सांगितले... फक्त जरा आणखी खरमरीतपणे. पण पुन्हा विचारांची मालिका तोडून भाषेवर काम करण्याऐवजी पळवाट काढली आणि खुलासा जोडला.
खुलाश्यातील भावना प्रामाणिक...