हा सगळ्यात कठीण ट्रेक आहे असे ऐकले आहे. फ़ास्टर फ़ेणेच्या गोष्टीत पहिल्यांदा वाचण्यात आला होता (पुस्तकः फ़ास्टर फ़ेणे टोला हाणतो; कथाः हरिश्चंद्रगडावर) त्या कथेतील खलनायक शेवटी गडावरील शंकराच्या पिंडीवर कपाळमोक्ष करून प्रायश्चित्त घेत असतो, असे भागवतांनी लिहिल्याचे आठवते.

आतापर्यंत बरेच ट्रेक्स केलेत, पण याचा योग अज़ून आलेला नाही. पण काही झाले तरीही एकदा करायचाच आहे.

छायाचित्रे पहायला आवडतील. कृपया येथे द्यावीत, किंवा त्यांचे दुवे द्यावेत, ही नम्र विनंती. फ़ा. फ़े. ला उज़ाळा मिळवून दिल्याबद्दल विशेष आभार ;)

(प्रतीक्षेत)चक्रपाणि