मस्त महाराष्ट्रियन थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर टिळक रस्त्यावरच्या 'सिद्धिविनायक' शिवाय पर्याय नाही.
पत्ताः- टिळक रस्त्यावर काका हलवाई सर्वांना माहीतच आहे. काका हलवाईच्या रेषेत पुढे एक नवीन 'कॉम्प्लेक्स'(मराठी शब्द सुचवावा) झाले आहे, त्याच कॉम्प्लेक्समध्ये 'सिद्धिविनायक' आहे.जवळची खूण म्हणजे सिद्धिविनायकच्या पुढे 'नेत्रम' म्हणून चष्म्याचे दुकान आहे. एवढा पत्ता पुरेसा वाटतो.
थोडेसे कौतुकः- पुण्यात आल्यापासून बऱ्याच ठिकाणी थाळी खाल्ली; दुर्वांकुर, रसोई, सुकांता, ऋतुगंध, सिद्धिविनायक, श्रेयस, सुवर्णरेखा, अतिथी, ललित महल, वैभव इ. मला आवडलेली ठिकाणे उतरत्या क्रमाने;
१. सिद्धिविनायक
२. सुकांता
३. दुर्वांकुर/रसोई
४. अतिथी/ललित महल
५. सुवर्णरेखा
आपणापैकी कोणी या ठिकाणच्या थाळिंचा आस्वाद घेतला असेल तर आपला पसंतीक्रम कळवावा.