भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.

ती कशी मिळावी? आपोआप मिळेल का? की विचारवंतांनी काही प्रयत्न करावे? विचारवंत कोण हे कसे ठरवणार? ..

असे अनेक प्रश्न पडले. मुक्तचिंतन वर म्हटल्याप्रमाणे थोडे कृत्रिम, थोडे भाषणाच्या अभिनिवेशात लिहिल्याप्रमाणे झाले आहे. तरी ते विचार करायला भाग पाडते हे खरे.

अमेरिकेच्या प्रगतीमागील अनेक कारणातील एक महत्वाचे, तिथली मुक्त आचार-विचार संस्कृती आहे की कसे असा प्रश्नही मला अधुनमधुन पडतो.