माझी प्रकाशण्याची पहिलीच वेळ होती
बाहूस यामिनीच्या तारे जुनेच होते
-- वावा.. छानच!
ठेवून लोक गेले नावं खुशाल मजला
माझे जणू नव्याने ते बारसेच होते
-- सुंदर!
इतर शेरांच्या मानाने मक्ता हा सगळ्यात सहज़ उतरलेला शेर आहे असे मला वाटते. पण अर्थगर्भिता आणि सौंदर्याच्या बाबतीत इतर शेर त्याच्यापेक्षा उज़वे आहेत असे वाटून गेले. असे का झाले याचा विचार करतोय.
द्राक्षकन्येसारखे अंमळ बोज़ड शब्द सहज़तेस मारक ठरतात (असे माझे मत आहे) नावं च्या ऐवजी नावे नक्की चालले असते. काही हरकत नाही.
शुभेच्छा.