खरोखरच सारा देश... विशेषतः महाराष्ट्र आणि गुजराथ ... ज्वालामुखीच्या भीतीखाली वावरतो आहे. कधी स्फोट होईल ते सांगणे कठीण झालेले आहे.
ही सारी शस्त्रे अत्याधुनिक आणि प्रचंड शक्तिशाली होती. राजकारण्यांनी जागे होऊन डोळे उघडण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होऊन सर्व प्रार्थनास्थळांमध्ये पोलीसांना प्रवेश हवा ही अगदी निकडीची गोष्ट झालेली आहे.
महत्वाचे म्हणजे जी पोलीसांची तुकडी, आणि एकूणच यंत्रणा ही सारी कारस्थाने समोर आणत आहे त्यांचे खरोखर कौतुक आहे. पुण्यांत काही संबंधितांशी बोलताना या नव्या तुकडीचे बरेच ऐकायला मिळाले.
आपण सर्वच जण या जवानांचे ऋणी आहोत.