माझे म्हणून लिहिलेले वरील विचार येथे मनोगतावर आणि इतरत्रही बऱ्याच जणांच्या मनात आहेत... किंबहुना माझ्याही पेक्षा अधिक स्पष्टपणे. माझे म्हणून त्यांत काहीही विशेष नाही याची पुरेपूर जाणीव आहे. हा केवळ विनय नव्हे.
माझे आवाहन हे फक्त प्रश्न विचारत राहण्यासाठी आहे... उत्तरे शोधण्याच्या धडपडीला बळ देण्यासाठी आहे. त्या प्रवासात अग्रेसर आहोत हेच जणू येथे नमूद केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार...
जाता जाता मनांत आलेला विचार - क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे