जॉनी डेप आणि अल पचिनो अभिनित हा फार सुंदर चित्रपट आहे. ह्यामध्ये गुन्हेगारी जगात वावरणारे पण कायम कफल्लक असणारे एक अवलिया पात्र अल पचिनो ने अप्रतिम रंगवले आहे. चित्रपटाच्या शेवटी अल पचिनोचा त्याच्याच लोकांकडून मृत्यू होणार असतो. त्याची चाहूल लेफ्टीला (पात्राचे नाव) लागलेली असते. ह्यातून काहीही मार्ग निघणे अशक्य आहे हे माहीत असल्याने,नियतीपुढे हतबल झालेला लेफ्टी अत्यंत शांतपणे मृत्यूला कवटाळतो ; 

असाच एक हेलावणारा मृत्यू आहे गॉडफादर ह्या सिनेमातील 'फ्रँकी फाईव्ह एंजल्स' ह्या पात्राचा. ह्याला इतिहासाचा खूप नाद असतो. आपल्या मृत्यू पूर्वी तो टॉम हेगन ह्या आपल्या मित्राला ग्रीक इतिहासातील गोष्ट सांगतो.

पूर्वीच्या काळी कोणी राजघराण्याशी गद्दारी केली तर त्यावर द्रोहाचा खटला भरत असत. परंतू त्याचा निकाल लागण्या आधीच आरोपीने जर आपणहून स्वतःला संपवले तर तर त्याबदल्यात त्याच्या कुटुंबीयांची पूर्ण जवाबदारी सरकार घेणार असा काहीसा अलिखित कायदा होता. अश्या वेळेस हे आरोपी सगळे उपाय संपले की एका संध्याकाळी आपल्या निवडक मित्रांना बोलावत एक  छोटीशी पार्टी करत आणि नंतर गुपचूप स्वतःची नाडी कापून मृत्यूला कवटाळत.

ह्यानंतर पुढच्या प्रसंगात हा फ्रँकी आपल्या बाथटब मध्ये मृतावस्थेत पडलेला दाखवलं आहे आणि बाहेर त्याचे मित्र बसले आहेत असा काहीसा खूपच छान शॉट आहे. आपल्या त्यावेळेस लक्षात येते की ही सगळी कथा सांगण्यामध्ये त्याला स्वतःचा जीव संपवून आपल्या कुटुंबीयांच्या जीवाची हमी घ्यायची होती.

अतिशय सुंदर दिग्दर्शन आणी अभिनय असलेला निव्वळ अप्रतिम प्रसंग!