मनोगतावर 'रंगलेल्या'/गाजलेल्या चर्चांचा सर्वसाधारण आलेख असा असतो -
- दिवस १-२ - चर्चा, मतमांडणी, मतभेद
- दिवस ३ - वाद- तार्किक
- दिवस ४ - वाद - अतार्किक, वैयक्तिक, मागील उणी-दुणी काढणे, विषयांतर
- दिवस ५ - भांडणे - विषयास धरून
- दिवस ६- १० - भांडणे - विषयाशी कोणताही संबंध नसलेली, हमरी-तुमरीवर येणे, प्रशासकांना एकमेकांचे प्रतिसाद काढून टाकण्याची आवाहने
- शेवट - प्रशासकांचा पोस्ट - "ही चर्चा संपवण्यात आली आहे. नवी चर्चा सुरू करावी"