अंजू,
खूपच छान वर्णन. वाचता वाचता भारतभेट घेऊन आले. आपल्या माणसांप्रमाणेच चहा आणि वडापाव तसेच इतर खाद्यपदार्थांचीही तितकीच ओढ वाटते. भारतात मिळणारा खराबातल्या खराब चवीचा चहा येथील चांगल्यात चांगल्या चहापेक्षा सरस असतो, हे भारत सोडल्यावर कळते.
"अखेर तो क्षण आला. औक्षण करून, ओटी भरून, आता कायमचेच इकडे या असे सगळ्यांचेच पाणावलेले डोळे सांगत होते." हे वाचताना आपोआपच डोळे भरून आले. तेथे घालवलेले दिवस जितके आनंदाचे त्याहून अधिक याक्षणाचे दुःख होते.
आणखीही आठवणी लिही.
श्रावणी