कथा चांगली वाटली. ओघ छान आहे.
पण शैली मात्र, अनुवादकाची वाटते. त्यामुळे भाषा थोडी कृत्रिम वाटली.
त्यामुळे बराच वेळ मी मूळ इंग्रजी कथेचा स्वैर अनुवाद वाचत आहे, आणि शेवटी मूळ कथेचे संदर्भ लिहिले असतील असे वाटत होते.
कथेमधील पत्र आणि (कथेमधील) कथा वेगळ्या रंगात आहेत ते चांगले वाटले पण....
माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणारा निसर्ग मला नेहमीच भुरळ घालतो. माणसाची कित्येक वर्षांची वाटचाल मला नेहमीच आकर्षित करते. याच ओढीतून मी हिमालयापासून थेट कन्याकुमारी पर्यंत भटकलो आहे. पुढे त्याने त्याच्या हिमालयातील एक स्कीइंगच्या ट्रीपचे वर्णन केले होते. चारही बाजूंना उंच उंच हिमाच्छादित शिखरे, बराकी, स्कीइंगचे उतार चढाव मन मोहीत करतात. वर निळ्या आकाशाचे पालथे घुमट, पाईन वृक्षाचा गंध आणि चांदीच्या रंगाचा पसरलेला प्रकाश!
हे (अधोरेखीत) वाक्य पत्रातले नसून कथेतले असल्याने ते काळ्या रंगात हावे होते असे वाटते.
माझा गैरसमज झाला असेल तर क्षमा करा.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला लिखाळ.