फ्रेंच टोस्ट या प्रकारात आपण म्हटल्याप्रमाणे फेसलेल्या अंड्यात थोडे दूध आणि किंचित (पिठी?)साखर घालतात, आणि तो काकवी अथवा मधाबरोबर खाल्ला जातो.
प्रस्तुत प्रकारात मिरी, मीठ आणि कोथिंबीर वापरलेली आहे, आणि तो टोमॅटो केचपबरोबर खाल्ला जात आहे. तस्मात्, प्रस्तुत प्रकारास फ्रेंच टोस्ट म्हणता येणार नाही.
परंतु हिंदुस्थानात प्रस्तुत प्रकारच "फ्रेंच टोस्ट" या नावाने सर्रास खपविला जात असल्याकारणाने, प्रस्तुत प्रकारास फार तर "फ्रेंच-हिंदुस्थानी टोस्ट" अथवा "पाँडिचेरी टोस्ट" म्हणणे सयुक्तिक ठरेल.
- टग्या.