संभावना ह्या शब्दाचा अर्थ मराठीत 'निंदा' असा होतो तर हिंदीमध्ये 'शक्यता' असा होतो. मात्र मराठीतही हिंदीच्या प्रभावाने शक्यता ह्या अर्थाने संभावना हा शब्द वापरला जाऊ लागला आहे. मनोगतावरही अशी उदाहरणे सापडतात.