वात्रट महोदय,

मी तर बऱ्याचदा मनोगतचा प्रचारक असल्याप्रमाणे या संकेतस्थळाची माहिती भेटेल त्याला सांगत असतो.  पण कार्यबाहुल्यामुळे मला स्वतःलाच मनोगतसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही... straight face

खरेतर इतर व्यवधाने सांभाळून हे ठराविक लोक मनोगतला कसे इतका वेळ देऊ शकतात याचे मला नेहेमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! हे लोक पोटापाण्यासाठी नक्की काय करतात याचेही मला कुतुहल आहे... इतकंच काय तर कधी कधी हे लोक मनोगतमधेच काम करतात की काय अशीही शंका मनामधे येते!  laughing

थट्टेने घ्या हो लेको...

नाहीतर पुढच्या एखाद्या चर्चेत माझीच दांडी उडवाल...

 

या ठराविक लोकांचा चाहता, happy

निरुभाऊ