वा वरदा,

खूप छान वाटले वाचून.

काही कविता पूर्ण (पाठ्यपुस्तकात होता तेवढा भाग) आठवताहेत. त्या आता इथे लिहित नाही. परंतु कुणाला हव्या असल्यास सांगा, जरूर लिहीन.

पद्मा भोळे (पद्मजा गोळे?) यांची आकाशवेडी (मंदारमाला) आठवत असेल तर पूर्ण देता का?

मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे मला भान नाही मुळी
डोळ्यांत माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणातळी

स्वप्नात माझ्या उषा तेवते अन् निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय नीडातुनी अन् विजा खेळती मत्त पंखातुनी

---
आकाशयात्रीस ना खेद त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी

पूर्ण दिलीत तर बरे होईल.

आपला
(भिक्षुक) प्रवासी