'बाज़ीचा-ए-अतफ़ाल'चा शब्दश: अर्थ खेळ, छोटा खेळ असा होईल. तिफ़्ल म्हणजे लहान मुलगा. तिफ़्लचे बहुवचन अतफ़ाल आहे. लहान पोरांचा छोटा खेळ, भातुकली किंवा पोरखेळ असे म्हणू या. बाज़ीचा-ए-अतफ़ाल ह्या शब्दाचा 'फ़िरोज़ुल लुग़त'मध्ये फारसे लक्ष देऊ नये अशी गोष्ट, किरकोळ गोष्ट असाही दिला आहे.

बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे
ह्या ओळीचा अर्थ, माझ्यासमोर ह्या जगाचा पोरखेळ सुरू असतो किंवा माझ्यालेखी ही दुनिया एक पोरखेळ आहे, असे निघू शकतात. ग़ालिब ह्या दुनियेची पर्वा करत नाही किंवा त्याला हा एकंदर पोरखेळच वाटतो, असे त्याला म्हणायचे असावे.

चित्तरंजन

अवांतर
बिरहमनच कश्याला जुन्नार किंवा जानवेदेखील ग़ालिबच्या कवितेत अनेक ठिकाणी आले आहे.