सर्वप्रथम मनोगतकारांचं अभिनंदन ! वेलणकरांच्या कामाला शासनानं दिलेली ही पावतीच आहे.
चित्तसाहेब आणि वात्रटराव, "पण वावर(नेविगेशन), सदस्यसंख्या, सदस्यांचा सहभाग, कंटेट, तंत्रज्ञान आणि मराठीच्या वापरावर जोर हे निकष लावले असल्यास 'मनोगत'लाच निर्विवादपणे प्रथम पारितोषिक मिळायला हवे होता. हे फ़ारसे पटले नाही.
माझ्या माहितीप्रमाणे 'लोकांना उपयोगी आणि नवीन माहिती देणारं संकेतस्थळ' हा सर्वात महत्त्वाचा निकष होता. आणि हे निकष स्पर्धेआधी जाहीर करण्यात आले होते. त्या निकषावर, 'अवकाशवेध.कॉम' खूपच सुंदर आहे. पॉवरपॉइंट, फ़्लॅश ह्यांच्या साहाय्याने सुर्यग्रहण, पिधान, धूमकेतू, आकाशगंगा यांपासून, क्यूपर बेल्ट, ऊर्टचा ढग यांसारख्या अनेक खगोलशास्त्रीय गोष्टी आणि घटनांची माहिती आहे.
शिवाय, आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, यांची देखील माहिती आहे. खरंतर 'अवकाशवेध.कॉम' हे खगोलीय माहिती नी संपन्न असे संकेतस्थळ आहे. मला स्वतःला याचा "पब्लिक रेलेव्हन्स" (प्रतिशब्द सुचला नाही) जास्त महत्त्वाचा वाटतो. अर्थात ह्यात वेलणकरांचे श्रेय तसूभरदेखील कमी होत नाही. 'आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं' हा न्याय इथे लावू नये ही विनंती.
आवकाशवेध चे कर्ते सचिन सखाराम पिळणकर आणि मनोगत चे महेश वेलणकर, दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या सुंदर मराठी निर्मितीसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा.
जे पी