'लोकांना उपयोगी आणि नवीन माहिती देणारं संकेतस्थळ' हा सर्वात महत्त्वाचा निकष होता.

ड्रुपलचा वापर करून बनविलेले हे पहिले मराठी संकेतस्थळ असावे. मनोगत ह्या संकेतस्थळाचा जगभर विखुरलेल्या मराठी जनांना मराठीत संवाद साधण्यासाठी उपयोग होत नाही काय? शिवाय ड्रुपलचा वापर करून बनवलेले हे मराठीतले पहिले संकेतस्थळ असावे. 

नवीन माहितीचे म्हणाल तर अक्षरवेध ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती लक्षवेधी असली तरीही नवी आहे आहे काय, ह्याचा विचार करावा लागेल.

अर्थात मनोगतावरदेखील तंत्रज्ञानावर, विज्ञान विषयांवर लिखाण होत असले तरी ते वाढायला हवे असे दिसते.

असो. अक्षरवेधच्या पिळणकरांचेही अभिनंदन. त्यांचे संकेतस्थळ सुंदर असावे. तारे, चंद्र, नक्षत्र, वगैरे वगैरे. पण तिथे मला सध्यातरी मराठी वाचता येत नाही. माझ्या ब्राउज़रांवर(आयई७ आणि फ़ायरफ़ॉक्स १.५.०.३) पीएफ़र ईओटी दोन्ही काम करताना दिसत नाही.

चित्तरंजन