या गझलेत एक शेर आहे
कहूं किससे मै के क्या है
शब-ए-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना
अगर एक बार होता
विरहाच्या रात्रीच दुःख कुणाला कसं सांगू? एकदा मरण येणार असत तर ते सहनही केल असतं. दुसऱ्या शब्दात.. त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणी मी मरणाचा अनुभव घेतला.
किती तीव्र वेदना आहे ह्या शब्दांमधे. वाचताना गालिबच्या मनस्थितिशी आपण एक्ररूप होउन जातो. गालिबच्या बाबतीत एक बारिकशी तक्रार म्हणजे त्याच लिखाण वाचून मन उदासीन होत. अर्थात ही गोष्ट शेक्सपिअर किंवा डिकन्स यांनाही लागू आहे.
कधी कधी मनात विचार येतो कि जर गालिब संपन्न घराण्यात जन्मला असता, तर त्याच
लिखाण कसं झाल असत?