मी एकंदरीत इंटरनेटवरील  कट्टा या प्रकारामध्ये नवखा आहे. मनोगतमध्ये तर नुकताच प्रवेश केला आहे. इतर कट्ट्यांच्या मानाने मला हा कट्टा जास्त कार्यक्षम वाटतो. पहिल्यांदाच या संकेतस्थळाला भेट दिली आणि ते इतके आवडले की बेधडक प्रवेश घेऊन टाकला. इथे सगळेच  सदस्य या ना त्या टोपणनांवानेच वावरतांना दिसले. त्यामुळे महाजनो येन गतः स पंथः असे म्हणून मी सुद्धा तोच मार्ग पत्करला. त्यामुळे मनसोक्त चर्चा करायला फावतं की बाधा येते याबद्दल अनुभवी जाणकार काय म्हणतात?