... मला अभिमान वाटतो.
ज्या धर्मात, जातीत, देशात माझा जन्म झाला त्याची भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील वाटचालीकडे पाहताना नितांत अभिमानच वाटतो.
तळटीप -
(१) मान खाली घालायला लावणाऱ्या प्रसंगाची चीड नाही असेही नाही.
(२) इतरत्र कोठे काहीही अभिमानास्पद नाही असेही बिलकुल नाही.
(३) जन्म हा केवळ योगायोग हे मान्य. त्यांत माझे कर्तृत्व काहीच नाही हे मान्य. पण माझ्या शाळेतील कोणी पराक्रम गाजविला तर मला अभिमान वाटतो. मनोगतावरील कोणी काही सत्कृत्य केले तर त्याचा मला अभिमान वाटतो. माझ्या आईवडीलांनी कोणत्याही कठीण प्रसंगी नीतिमत्ता सोडली नाही याचा अभिमान वाटतो.... या साऱ्यांत माझा काहीही सहभाग नाही तरीही! कारण एकच ही सारी माझी माणसे आहेत... आणि याच माझ्या माणसांनी सारे विश्वचि माझे घर हे ही मला शिकविले आहे.
(४) जगाकडून मला आणि माझ्या माणसांना बरेच शिकण्यासारखे आहे. मला अभिमान हा आहे... की माझी माणसेही जगाला उपयुक्त असे बरेच काही देऊ शकतात... देत आलेली आहेत.