मी मृदुला यांच्याशी सहमत आहे. जेव्हा मी असे म्हणतो की मला विशिष्ट धर्म/भाषा यांचा अभिमान आहे तेव्हा नकळत मी दुसरी जात/धर्म यांच्याशी त्याची तुलना करतो आणि माझ ते श्रेष्ट अशी त्यामागची भावना असते.

मानववंशशास्त्र हा माझा आवडीचा विषय. त्यामधुन अस लक्षात आल की सर्व मानवजातीचा उगम आफ्रिकेतुन झाला. जसजशी माणसांची वस्ती पसरयला लागली तसतशी निरनिराळ्या भाषा, कल्चर्स यांची निर्मिती झाली.
शेवटी ह्या सगळ्या man-made गोष्टी आहेत. अभिमान कशाचा आणि का बाळगायचा?
(आणि मलाही अभिमान बाळगायचा म्हणजे नक्की काय करायच ते कळलेलं नाही)

माझ्या मते एक गोष्ट महत्वाची आहे. कुठल्याही परिस्थितीमधे माणुसकी जागी रहायला हवी. उदा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ऑस्कर शिंडलरने जे केलं तसं त्याच्या ०.१ टक्के जरी करता आलं तरी त्याबद्दल कृतार्थता वाटायला हरकत नाही. (इथेही अभिमान ही भावना योग्य वाटत नाही.)