एकलव्य व तात्या यांच्याशी सहमत.

अभिमान आणि दुराभिमान यात आपण गल्लत तर करीत नाही ना?.. वरील पैकी सर्वांना (एकलव्य व तात्या वगळता ) अभिमान आहे पण दुराभिमान नाही असे तर म्हणायचे नाही ना?..कौतुक वगैरे शब्द अभिमान या शब्दाला समांतर म्हणून वापरले आहेत का ? असा प्रश्न पडला.

पण जर खरोखरच सर्वांचा अभिमान गळून वगैरे पडला असेल तर, ही फार उच्च पातळीची आध्यात्मिक स्थिती आहे असे (वाचलेल्या माहितीवरून) वाटते.
पण उच्च आध्यात्मिक स्थितीतल्या विवेकानंदांना जाज्वल्य वगैरे अभिमान होता असे वाचलेले आहे. आता तर मीच या सर्व विचारी लोकांच्या मतांमुळे गोंधळात पडलो आहे.
(तात्या मला वाचवा...!)

नक्की अभिमान या शब्दाची / भावनेची व्याख्या काय ?

आपलाच,
(अभिमानी, पण विचारीजनांच्या निराभिमानतेमुळे गडबडलेला)
लिखाळ.