लक्षणे

मी, माझा महाराष्ट्र (पुणेकर असे-तसे, मुंबई अशी-तशी), माझा देश (लुंगी वाले आण्णा नि निर्बुद्ध सरदारजी), माझा धर्म (नि हलक्या जाती), माझी बोलीभाषा (त्यांची ग्राम्य), माझी शेली (त्यांचे अज्ञान, चुका). :D

या साठी खालील उपाय करून पाहा.

लक्षात घ्या, माझी जात म्हणजे मी नि आजुबाजुचे नव्हे, माझा धर्म म्हणजे माझी जात नव्हे, माझा देश म्हणजे (निव्व्ळ) महाराष्ट्र (काश्मीर फार तर) नव्हे! परदेशात मानवजातीबद्दलचा अभिमान स्मरा, स्वदेशाभिमान बाजूस सारा, परप्रांतात स्वदेशभक्ती की काय ते आठवून पाहा, नन्न देश पाहा, अनुभवा. संस्कृतीच्या अभिमानासाठी मराठी संस्कृतीपलीकडे पाहा, भारताबद्दलच्या अभिमानासाठी महाराष्ट्राबाहेर, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी शहरा, जिल्ह्याबाहेर नि असेच पुढे. बरेच वृथा अभिमान गळून नवे अभिमान बनतील हे नक्की.

माझ्या धर्माची/देशाची बाजू = माझी बाजू = बरोबर बाजू असे नेहमी असेलच असे नाही ही शक्यता धरून सुरुवात करा व प्रत्येक 'बरोबरी'साठी आधार शोधा.

अभिमानाबद्दल,

आत्मा हाच परमात्मा आहे :) .मी ला पुरते हटवणे भलतेच कठीण आहे, अगदी 'त्या'लाही ;) (कारण मी च्या जागी तो येऊन बसतो :( )